मुसलमान युवतीचा गंभीर आरोप
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कुशीनगर जिल्ह्यात एका मुसलमान तरुणीने हिंदु धर्मात प्रवेश करत हिंदु युवकाशी विवाह केला. यानंतर संबंधित तरुणीने ‘पोलीस माझ्या पतीच्या (म्हणजे हिंदु युवकाच्या) कुटुंबियांचा छळ करत आहेत’, असा आरोप केला. या तरुणीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याकडे साहाय्य मागितले आहे. तिने या संदर्भात व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात ‘मी सनातन हिंदु धर्माचा स्वीकार केला असून एका हिंदु युवकाशी विवाह केला आहे; मात्र रवींद्रनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्रास देत आहेत. एक मुसलमान युवती हिंदु धर्म स्वीकारू शकत नाही का ? तुम्ही मला रोखणारे कोण आहात ? मी जय श्रीराम म्हणत रहाणार. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. पोलीस माझ्या माहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन मला विरोध करत आहेत.
कितने आश्चर्य की बात है कि जिहादी हिंदू से मुसलमान बनाने के लिए तो पैसे देते ही हैं परंतु कोई मुस्लिम लड़की हिंदू ना बन जाए उसके लिए भी खर्चा कर रहे हैं।
और दूसरी और सिस्टम में बैठे हिंदू हैं जो म्लेच्छों का यह उत्कोच स्वीकार कर धर्म का अहित कर रहे हैं। pic.twitter.com/sGM7nx5mTo
— Gopal Goswami (@igopalgoswami) June 12, 2023
पोलिसांनी आरोप फेटाळले !
रवींद्रनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मिश्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
संपादकीय भूमिकाजर या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! |