काँग्रेसला स्पष्ट बहुमत !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. १० मे या दिवशी झालेल्या मतदानानंतर १३ मे या दिवशी मतमोजणी करण्यात आली. यात काँग्रेस २२४ जागांपैकी १३५ जागांवर आघाडीवर असून भाजपला केवळ ६३ जागांवर आघाडी मिळाली आहे.

देहलीतील एका महिलेच्या धर्मांतराच्या बातम्या संकेतस्थळांवरून हटवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मानक प्राधिकरण यांनाही नोटिसा ! ‘बातम्या काढण्यात आल्या नाही, तर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणीही न्यायालयाने दिली आहे.

धर्मस्थळाद्वारे पैसे कमावणे हे विनाशाचे लक्षण असल्याने सत्ताधार्‍यांना दुष्परिणाम भोगावे लागतील !

बारा ज्योतिर्लिंगांपैकी येथील महाकालेश्‍वर मंदिरात चालू असलेली सशुल्क दर्शन व्यवस्था बंद करण्याची मागणी संत आणि महंत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र लिहून ही व्यवस्था बंद करण्याची मागणी केली आहे.

केरळमधील ख्रिस्ती आणि इस्लामी शाळांकडून ‘डार्विन सिद्धांता’च्या अभ्यासक्रमाच्या सक्तीला विरोध !

साम्यवादी सरकारला हिंदूंच्या मतांचे मोल नाही, हेच यातून सिद्ध होते. आता ‘मोगलांचा इतिहास परत शिकवता कामा नये’, यासाठी तेथील हिंदूंनी साम्यवाद्यांवर संघटितपणे दबाव आणला पाहिजे !

पाकने १९८ भारतीय मासेमार्‍यांची केली सुटका !

भारतीय मासेमार्‍यांना समुद्रातील सीमा लक्षात येण्यासाठी भारत सरकारने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यामुळे चुकून सीमा ओलांडल्यामुळे या मासेमार्‍यांना होणारा नाहक त्रास अल्प होऊ शकेल !

(म्हणे) ‘पाकिस्तानी सैन्याचा लोकशाहीवर विश्‍वास !’ – पाक सैन्य

पाकिस्तानी सैन्याचा विनोद ! पाकिस्तानमध्ये लोकशाहीपेक्षा सैन्याशाहीच सर्वाधिक काळ राहिलेली आहे. त्यामुळे आताही तीच स्थिती निर्माण होणार, यात पाकिस्तान्यांनाही शंका राहिलेली नाही !

भाग्यनगरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती ! – आमदार टी. राजासिंह

१०० कोटी हिंदूंच्या देशात हिंदुत्वनिष्ठ नेते असुरक्षित असणे हिंदूंना लज्जास्पद ! अशा धमक्या कधी अन्य पंथीय नेत्यांना मिळत नाहीत, हे लक्षात घ्या !

देहलीत साधू आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्येचा होता कट ! – देहली पोलिस

सरकार जोपर्यंत जिहादी आतंकवाद्यांना भरचौकात फासावर लटकवत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर वचक निर्माण होणार नाही आणि ते हिंदूंचे साधू-संत, नेते यांना ठार मारत रहातील !

अंदमान, बंगाल आणि ओडिशात ‘मोचा’ चक्रीवादळाची चेतावणी !

भारतीय हवामान खात्याने अंदमान-निकोबार, बंगाल आणि ओडिशा येथे ‘मोचा’ नावाच्या चक्रीवादळाची चेतावणी दिली आहे. मोचा चक्रीवादळामुळे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक झाडे उन्मळून पडली.

संयुक्त शाहूपुरीच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज उत्सवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना !

संयुक्त शाहूपुरी संघटनेच्या वतीने आयोजित छत्रपतीसंभाजी महाराज उत्सवात १२ मे या दिवशी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.