|
नवी देहली – आतंकवादी नौशाद आणि जगजीत सिंह जस्सा उपाख्य याकुब यांचा साधू अन् हिंदुत्वनिष्ठ यांची हत्या करण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती देहली पोलिसांनी या दोघा आतंकवाद्यांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात दिली. या दोघांना देहली पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये अटक केली आहे.
Yakub and Naushad, who had beheaded a Hindu in the Bhalswa Dairy area, were tasked by ISI to execute a rerun of 2000 Red Fort attack: Delhi policehttps://t.co/QKIPCkppHn
— OpIndia.com (@OpIndia_com) May 11, 2023
आरोपपत्रातील सूत्रांनुसार,
१. आय.एस्.आय. या पाकच्या गुप्तचर संस्थेने नौशाद आणि याकुब या दोघा आतंकवाद्यांना या हत्यांची सुपारी दिली होती. आय.एस्.आय.कडून या दोघांना प्रत्येक हत्येसाठी दीड कोटी रुपये देण्यात येणार होते. यासह या आतंकवाद्यांना नुकताच अटक झालेला खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याच्या घरात लपवण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. (यावरून आय.एस्.आय. आणि खलिस्तानी समर्थक यांच्यातील साटेलोटे दिसून येते ! – संपादक)
२. नौशाद आणि याकुब या दोघांनी राज कुमार नावाच्या हिंदु युवकाचे अपहरण करून त्याला भलस्वा डेअरी भगात नेऊन तेथे त्याचा गळा चिरला अन् त्याच्या शरीराचे ८ तुकडे केले होते. याचा व्हिडिओ बनवून त्यांनी तो आय.एस्.आय.ला पाठवला होता. हा व्हिडिओ पाहूनच आय.एस्.आय.ने या दोघांवर पुढच्या हत्यांचे दायित्व सोपवले. राजकुमार याच्या हातावर असलेल्या भगवान शिवाचा ‘टॅटू’ पाहून तो हिंदु असल्याचे या दोघांनी ओळखले होते. या दोघांच्या अटकेनंतर त्यांच्या भ्रमणभाषमधील राजकुमार याच्या हत्येचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला.
३. या हत्यांसाठी आय.एस्.आय.च्या ‘काश्मीर-खलिस्तान विभागा’ने सिद्ध केलेल्या ‘हिट लिस्ट’ मध्ये पंजाबमधील शिवसेना, बजरंग दल यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, तसेच काँग्रेसचा एक मोठा नेता, यांचा समावेश होता.
४. या हत्यांच्या माध्यमातून आय.एस्.आय.ला भारतात सर्वत्र दंगली घडवून आणायच्या होत्या, तसेच हिंदू आणि शीख यांच्यामध्ये एकमेकांविषयी अविश्वास निर्माण करायचा होता. याद्वारे खलिस्तानी आतंकवादाला खतपाणी घालण्याचे आय.एस्.आय.चे षड्यंत्र होते.
५. नौशाद हा ‘हरकत उल् अंसार’ या संघटनेचा सदस्य आहे. तो हत्यांच्या २ प्रकरणांत सहभागी होता. त्यांत त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. यासह एका बाँबस्फोटाच्या प्रकरणीही त्याला १० वर्षांची शिक्षा झाली आहे. याकुब हा ‘बंबीहा’ टोळीचा सदस्य असून तोही एका हत्येेत सहभागी होता. हे दोघेही हल्द्वानी कारागृहात बंदीवान होते. तेथेच त्यांची ओळख झाली. हे दोघे एका वर्षापूर्वी ‘संचित रजे’वर अर्थात् ‘पॅरॉल’वर होते. त्यानंतर त्यांनी पुढचे गुन्हे करणे चालू केले होते.
संपादकीय भूमिका
|