गोवा सरकारकडून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश आरक्षण घोषित

डॉ. आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर केवळ १० वर्षे आरक्षणाची तरतूद केली होती. आरक्षण देणारे हे लक्षात घेतील का ?

गोवा : पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांना न्यायालयाकडून १० सहस्र रुपयांचा दंड

अशा अन्यायकारक वर्तणुकीसाठी कठोर शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील. पोलीस अधीक्षक पदावरील व्यक्ती जर तक्रारदाराला अशी वागणूक देत असेल, तर त्याखालील अधिकारी आणखी कसला आदर्श घेणार ?

आद्यपत्रकार देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता’ यावर व्याख्यान !

विश्व संवाद केंद्र आणि ‘सत्यवेध माध्यम समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यपत्रकार देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकार आणि वार्ताहर यांच्यासाठी १३ मे या दिवशी सकाळी ११ वाजता विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाआवास अभियानात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रथम !

मराठवाड्यात महाआवास अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रथम, धाराशिव द्वितीय, तर हिंगोली जिल्हा परिषदेने तृतीय पुरस्कार मिळवला आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ‘एल्.ई.डी. टी.व्ही.’ची सुविधा उपलब्ध !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना मंदिराच्या परिसरात देवीचे दर्शन होण्यासाठी ‘एल्.ई.डी.टी.व्ही.’ बसवण्यात येणार आहेत.

शिवसेनेच्या निवेदनानंतर वीज आस्थापनाकडून त्वरित नोंद घेत ‘फिडर’ स्वतंत्र केला !

ब्राह्मणपुरी येथील शिवनेरी फिडर येथे विजेचा ताण वाढल्याने आता स्वतंत्र ‘फिडर’ वाढवावा, अशी मागणी करूनही त्याची नोंद घेण्यात आली नाही. यामुळे ब्राह्मणपुरी परिसरात वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

पिंपरी महापालिकेचा कर्मचारी ७ वर्षे कामावर अनुपस्थित !

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात काम करणारा कर्मचारी ७ वर्षे कामावर आला नाही. प्रशासनाने त्याला कामावरून काढून न टाकता वारंवार संधी देऊन पाठिशी घातले.

किशोर आवारे यांची तळेगाव येथे नगर परिषद कार्यालयासमोर हत्या !

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव-दाभाडे नगर परिषद कार्यालयासमोर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. १२ मे या दिवशी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंद !

आंतरिक राजस्व सेवा (internal revenue service) अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘एस्.टी.’चे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिदिन सरासरी उत्पन्न १ कोटी रुपये !

बसप्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय आणि उन्हाळ्यातील गर्दीचा हंगाम यांमुळे वाढलेल्या प्रवाशांमुळे कोल्हापूर जिल्हा एस्.टी.चे प्रतिदिन मे मधील सरासरी उत्पन्न १ कोटी रुपये इतके आहे.