आरोपीच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचे न्यायालयाचे मत !
नवी देहली – देहलीत रहाणार्या एका महिलेला तिच्या मुसलमान प्रियकराकडून धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्यात आलेल्या घटनेचे वृत्त आणि व्हिडिओ संकेतस्थळांवरांवर हटवण्याचा आदेश देहली उच्च न्यायालयाने ट्विटर, गूगल, तसेच अन्य सामाजिक माध्यमे यांना दिला आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मानक प्राधिकरण यांनाही याविषयी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ‘बातम्या काढण्यात आल्या नाही, तर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणीही न्यायालयाने दिली आहे.
दिल्ली हाईकोर्ट ने सुदर्शन न्यूज, सोशल मीडिया प्लेटफॉर्मों को मुस्लिम व्यक्ति पर जबरन धर्मांतरण का आरोप लगाने वाली खबरों को हटाने का आदेश दिया #DelhiHighCourt #Media https://t.co/cORgoqCkBs
— Live Law Hindi (@LivelawH) May 12, 2023
१. न्यायालयाने आदेश देतांना म्हटले की, हा एक गंभीर धोका आहे; कारण लोक सामाजिक माध्यमांवर अशा बातम्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. याचिकाकर्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने या बातम्या हटवल्या गेल्या पाहिजेत.
२. याचिकाकर्त्याचे नाव अजमत अली खान आहे. त्याने सांगितले की, तो या महिलेसमवेत गेल्या ८ वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहात आहे. या महिलेने तक्रार केल्यानंतर त्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. त्या बातम्या संकेतस्थळांवरून काढून टाकण्यासाठी याचिका प्रविष्ट केली आहे. अशा बातम्यांमुळे जीव, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता गंभीरपणे धोक्यात येत आहे, असे खान याने म्हटले. त्याच्यावरील धर्मांतराचा आरोपही खोटा असल्याचा दावाही त्याने केला.