सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबर या दिवशी भारतीय नौसेना दिन साजरा होणार

यावर्षी हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती !

गोवा : सर्वाेच्च न्यायालयाचा कॅसिनोचालकांना दणका !

जी आस्थापने संपूर्ण वार्षिक परवाना जमा करणार आहेत, त्यांना याचिका फेटाळल्यास अतिरिक्त व्याज द्यावे लागणार नाही; मात्र जे कॅसिनोचालक ७५ टक्के रक्कम जमा करणार आहेत, त्यांना मात्र याचिका फेटाळली गेल्यास व्याजासह उर्वरित रक्कम द्यावी लागणार !

‘एन्.सी.बी.’कडून गोव्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई

संशयित रशियन ऑलिंपिकपटू श्वेतलाना वर्गानोव्हा या माजी ऑलिंपिकपटू असून तिने वर्ष १९८० मध्ये रौप्यपदक पटकावले होते. संशयित तथा रशियातील निवृत्त पोलीस अधिकारी आंद्रे याचा अमली पदार्थ जगताशी संबंध आहे.

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक प्रकरणी गोवा पोलीस आणि पर्यटन खाते यांची संयुक्त कारवाई

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई केल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हे प्रकार टळतील !

खराडी (पुणे) येथे गांजा विक्री करणार्‍या धर्मांधाला अटक !

अंमली पदार्थांची विक्री करणार्‍या धर्मांधांची मोठी यंत्रणा पोलीस प्रशासन कधी नष्ट करणार आहे ?

सोलापूर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांची हानी !

सलग २७ आणि २८ एप्रिल या दिवशी वादळी वार्‍यासह झालेल्या अवेळी पावसामुळे विजेचे खांब अन् अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतीतील पिकांची मोठी हानी झाली.

हास्यास्पद साम्यवाद !

‘वनस्पती, प्राणी, मानव इत्यादींत साम्यवाद नाही. एवढेच नव्हे, तर पृथ्वीवर ७०० कोटींहून अधिक असलेल्या मानवांपैकी कोणत्याही दोन मानवांचे धन, शिक्षण, शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांत साम्य नाही. असे असतांना ‘साम्यवाद’ म्हणणे हास्यास्पद नाही का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काँग्रेस आणि विषारी साप !

सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे घोंगावत आहेत. निवडणुका म्हटले की, तेथे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात, हे नेहमीचेच चित्र सर्वांना पहायला मिळते; मात्र हे आरोप करतांना काही राजकीय नेत्यांकडून ताळतंत्र सोडून इतर पक्षांतील नेत्यांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची … Read more

विद्यार्थ्यांना साधना न शिकवल्याचा दुष्परिणाम !

फलक प्रसिद्धीकरता आंध्रप्रदेश मध्यवर्ती परीक्षा मंडळाकडून इयत्ता ११ वी आणि १२ वीचा निकाल घोषित करण्यात आल्यावर अवघ्या ४८ घंट्यांत ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर अन्य २ विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/678115.html

 ‘मंदिरांच्या ऐवजी रुग्णालये उभारा’, असे म्हणणे हे धर्मभावना दुखावणारे !

‘आजकाल जो तो उठतो आणि प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत किंवा सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करत आहेत, ‘भारताला मंदिरे नाही, तर केवळ रुग्णालयाची आवश्यकता आहे.’ काही अंशी ते खरेही मानले, तरी मानवतेच्या दृष्टीकोनापेक्षाही मंदिर आणि त्यापेक्षाही हिंदु धर्म यांविषयीचा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन यांतून व्यक्त होतो.