राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीसह नौसेनेच्या सामर्थ्याचे होणार प्रदर्शन
सिंधुदुर्ग – जगातील चौथ्या क्रमांकाची बलाढ्य नौसेना म्हणून भारतीय नौसेनेला मान आहे. वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर केलेल्या आक्रमणामुळे पाकिस्तानवर भारताला शरण येण्याची वेळ आली होती. या आक्रमणामुळे भारतीय नौदलाची शक्ती सर्व जगाला कळली. त्यानंतर प्रतिवर्षी ४ डिसेंबर हा दिवस ‘भारतीय नौसेना दिन’ म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी ४ डिसेंबर या दिवशी हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे.
(सौजन्य : ABP माझा)
या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. यानिमित्त भारतीय नौसेनेच्या सामर्थ्याचे प्रदर्शन सिंधुदुर्गच्या समुद्रात केले जाणार आहे.