डेल्टा कॉर्पोरेशनला जीएसटी विभागाकडून ११ सहस्र कोटींची नोटीस

या आस्थापनाला ११ सहस्र १३९ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावली असून ५ सहस्र ६८२ कोटी रुपयांची दुसरी नोटीस या आस्थापनातील कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा या सलग्न आस्थापनांना बजावण्यात आल्या आहेत.

गोव्यात कॅसिनोंना दिलेल्या अधिमान्यतेमुळेच वासनांधतेचा उद्रेक ! – डॉ. नंदकुमार कामत, गोवा विद्यापिठातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधक

कॅसिनो म्हणजेच जुगार याला महसूल प्राप्तीसाठी अधिमान्यता दिल्यानंतर समाजाचे नैतिक अध:पतन हे ठरलेलेच आहे. गोव्यात कॅसिनोला दिलेल्या अधिमान्यतेचे दृश्यपरिणाम आता दिसू लागले आहेत.

गोव्यातील कॅसिनोमध्ये पैसे हरलेल्या पुण्यातील व्यावसायिकाची आत्महत्या

सदर कॅसिनोवर व्यावसायिकाची फसवणूक करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याविषयी कॅसिनोमधील २ महिला कर्मचार्‍यांवर प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने केली आहे. 

गोवा : सर्वाेच्च न्यायालयाचा कॅसिनोचालकांना दणका !

जी आस्थापने संपूर्ण वार्षिक परवाना जमा करणार आहेत, त्यांना याचिका फेटाळल्यास अतिरिक्त व्याज द्यावे लागणार नाही; मात्र जे कॅसिनोचालक ७५ टक्के रक्कम जमा करणार आहेत, त्यांना मात्र याचिका फेटाळली गेल्यास व्याजासह उर्वरित रक्कम द्यावी लागणार !

गोवा : कॅसिनोंची कोरोना महामारीच्या काळातील ३२२ कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

गोवा सरकारने कॅसिनोचालकांना वार्षिक १२ टक्के दराने दंडात्मक व्याजासह बंद कालावधीतील आवर्ती कराची थकबाकी भरण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला कॅसिनोचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

‘आर्थिक लाभ होत असेल, तर गोवा राज्य ही कॅसिनोची राजधानी घोषित करू !’

या वक्तव्याचे समाजात उमटले तीव्र पडसाद ! गोवा ही परशुरामभूमी आणि मंदिरांची भूमी आहे. पर्यटनाच्या नावाने गोव्याला भोगभूमी करणे जनतेला अपेक्षित नाही !

पणजी बनत आहे जुगाराची राजधानी ! – शैलेंद्र वेलिंगकर, परशुराम सेना

गोव्याची राजधानी पणजी आता जुगाराची राजधानी होऊ लागली आहे. तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याने आम्ही दिवसाढवळ्या कॅसिनोत जाऊन हा प्रकार उघडकीस आणला, असे परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले.