(म्हणे) ‘पूर्व लद्दाखमध्ये भारत-चीन यांच्यातील संघर्षावर उपाय काढू !’ – चीन

कावेबाज चीनच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !

राज्यातील सर्व ग्रामपंचायती चालणार सौरऊर्जेवर, राज्यशासन गाठणार उद्दिष्ट !

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत भविष्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायती सौरऊर्जेवर चालवण्याचा महत्त्वकांक्षी टप्पा गाठण्याचे प्रयत्न राज्यशासनाकडून चालू करण्यात आले आहेत.

भारतियांना पाकिस्तान नाही, तर चीन सर्वांत मोठे आव्हान वाटते ! – अमेरिकेतील खासदार रो खन्ना

भारतीय लोक पाकिस्तानऐवजी चीनला सर्वांत मोठे सैनिकी आव्हान मानतात, असे विधान अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी केले आहे.

(म्हणे) ‘गेल्या निवडणुकीत मी ‘हिंदुविरोधी’ असल्याचा अपप्रचार करण्यात आला !’ – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

गोहत्येचे जाहीर समर्थन करणारे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हीन लेखणारे आणि क्रूरकर्मा टिपू सल्तानचा उदोउदो करणारे सिद्धरामय्या हे हिंदुविरोधीच होते आणि आहेत, हे सुज्ञ हिंदु जनता ओळखून आहे !

‘बाळूमामा देवस्थान’चे विश्‍वस्त मंडळ विसर्जित : प्रशासकपदी शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती

आदमापूर (तालुका भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाच्या कारभाराच्या विरोधात भक्तांकडून धर्मादाय आयुक्तांकडे विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल २४ एप्रिलला लागला आणि यानंतर ‘बाळूमामा देवस्थान’चे विश्‍वस्त मंडळ विसर्जित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

इयत्ता १ ली ते १० वीच्या अभ्यासक्रमात आता ‘कृषी’ विषयाचा समावेश !

इयत्ता १ ली ते १० वीच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

आतंकवाद पसरवणार्‍या देशाशी संबंध ठेवू शकत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

एस्. जयशंकर म्हणाले, सीमापार वाढणारा आतंकवाद संपवायला हवा. आम्हाला आशा आहे की एक दिवस आम्ही तो टप्पा गाठू.

देशभरातील ५०० हून अधिक अधिवक्ते आणि माजी न्यायाधीश यांच्याकडून समलैंगिक विवाहांच्या विरोधात प्रस्ताव संमत !

विश्‍व हिंदु परिषदेच्या न्यायिक विभागाकडून आयोजित राष्ट्रीय संमेलनामध्ये विहिंपशी संबंधित विविध राज्यांतील ५०० हून अधिक अधिवक्ते आणि माजी न्यायाधीश यांनी समलैंगिक विवाहांच्या विरोधात एकमुखाने प्रस्ताव संमत केला.

पाकिस्तानचे हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी ईदच्या शुभेच्छा देतांना म्हटले ‘जय श्रीराम’ !

पाकिस्तानी संघाचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी २२ एप्रिल या दिवशी मुसलमानांना ईदच्या शुभेच्छा देणारे एक चित्र प्रसारित केले होते. या चित्राच्या छायाओळीत ‘जय श्रीराम’ लिहिल्याने धर्मांध मुसलमान संतापले.

कर्नाटकातील मुसलमानांचे आरक्षण रहित करण्याच्या याचिकेवर ९ मे नंतर निर्णय

कर्नाटकमधील भाजप सरकारने राज्यातील मुसलमानांसाठी असलेले ४ टक्के आरक्षण रहित करण्याच्या निणर्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.