कर्नाटकातील मुसलमानांचे आरक्षण रहित करण्याच्या याचिकेवर ९ मे नंतर निर्णय

नवी देहली – कर्नाटकमधील भाजप सरकारने राज्यातील मुसलमानांसाठी असलेले ४ टक्के आरक्षण रहित करण्याच्या निणर्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर ९ मे या दिवसापर्यंत निर्णय देण्यात येणार नाही; कारण राज्य सरकारने याविषयी मत मांडण्यासाठी वेळ मागितला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ९ मे पर्यंत मुसलमानांसाठीचे आरक्षण लागू असणार आहे.