पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंची घरे जोधपूर प्रशासनाने पाडली !

जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकलेली हिंदूंची घरे

जोधपूर (राजस्थान) – पाकिस्तानमधून भारतात आलेल्या शरणार्थी हिंदूंची येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्हणणे आहे की, ही भूमी त्यांनी विकत घेऊन तेथे बांधकाम केले होते. प्रशासकीय अधिकार्‍याने म्हटले की, येथे अनुमतीविना बांधकाम करण्यात आले होते. संबंधितांकडे भूमीविषयीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. घरांवर कारवाई करत असल्याने संतप्त झालेल्या पाकिस्तानी हिंदूंनी पथकावर दगडफेक केली. यात काही अधिकारी आणि बुलडोझर चालक घायाळ झाले. याविषयी पोलिसांत गुन्हा
नोंदवण्यात आला आहे.

(सौजन्य : Upananda Brahmachari) 

या हिंदूंना दीर्घकालीन मुदतीचा व्हिसा मिळालेला आहे; मात्र त्यांना अद्यापही भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही.

संपादकीय भूमिका

  • राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने पाकमधून जीव वाचवून भारतात आलेल्या शरणार्थीं हिंदूंना ते दुसर्‍या पाकिस्तानी राजवटीत असल्यासारखेच वाटत असेल !
  • अनेक ठिकाणी कायदाद्रोही अल्पसंख्यांकांची बांधकामे पाडण्यास गेलेल्या पथकाला रोखण्यासाठी एकजात सर्व ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष, नेते आदी धावून जातात, तसेच न्यायालयात याचिका प्रविष्ट करतात; मात्र शरणार्थी हिंदूंच्या घरांसाठी कुणीही धावून जात नाही, हे लक्षात घ्या !