भारतियांना पाकिस्तान नाही, तर चीन सर्वांत मोठे आव्हान वाटते ! – अमेरिकेतील खासदार रो खन्ना

अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय लोक पाकिस्तानऐवजी चीनला सर्वांत मोठे सैनिकी आव्हान मानतात, असे विधान अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी केले आहे. ते स्टॅनफोर्ड विश्‍वविद्यालयातील परराष्ट्र नीतीविषयीच्या एका व्याख्यानात बोलत होते.

खन्ना पुढे म्हणाले की, चीन आशिया खंड त्याच्या अधिपत्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तो सीमावादावरून भारताला धमकावत आहे, तर अन्य देशांशी कनिष्ठ सहकार्‍यासारखा व्यवहार करत आहे. अमेरिकेने भारत आणि अन्य आशियाई सहयोगी देशांशी संबंध भक्कम करण्याची आवश्यकता आहे. तसेच अमेरिकेला चीनसमवेतचे त्याचे संबंध पुन्हा चांगले करण्याची आवश्यकता आहे. यामुळे आपल्याला आणि आशियातील आपल्या सहकार्‍यांना मिळणार्‍या आव्हानाविषयी स्पष्टता येईल. मला अशा आहे की, आपला मुत्सद्दीपणा आणि नेतृत्व यांच्यामुळे २० व्या शतकाच्या तुलनेत २१ वे शतक अल्प हिंसेचे असेल.