(म्हणे) ‘गेल्या निवडणुकीत मी ‘हिंदुविरोधी’ असल्याचा अपप्रचार करण्यात आला !’ – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे हास्यास्पद विधान !

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – वर्ष २०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी ‘हिंदुविरोधी’ असल्याचा अपप्रचार करण्यात आला होता, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. हे सूत्र निवडणुकीच्या वेळी केंद्रस्थानी होते. ‘मी बहुसंख्य समाजाच्या श्रद्धेच्या विरोधात नाही’, असेही सिद्धरामय्या म्हणाले. १० मे या दिवशी कर्नाटक राज्याची निवडणूक होत आहे. त्या निमित्ताने त्यांनी वरील विधान केले.

संपादकीय भूमिका

  • गोहत्येचे जाहीर समर्थन करणारे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हीन लेखणारे आणि क्रूरकर्मा टिपू सल्तानचा उदोउदो करणारे सिद्धरामय्या हे हिंदुविरोधीच होते आणि आहेत, हे सुज्ञ हिंदु जनता ओळखून आहे !