पाकिस्तानचे हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी ईदच्या शुभेच्छा देतांना म्हटले ‘जय श्रीराम’ !

धर्मांध मुसलमानांकडून संताप व्यक्त !

दानिश कनेरिया

नवी देहली – पाकिस्तानी संघाचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी २२ एप्रिल या दिवशी मुसलमानांना ईदच्या शुभेच्छा देणारे एक चित्र प्रसारित केले होते. या चित्राच्या छायाओळीत ‘जय श्रीराम’ लिहिल्याने धर्मांध मुसलमान संतापले. या प्रकरणी पाकिस्तान आणि भारत येथील मुसलमानांनी कनेरिया यांचा निषेध केला आहे.

१. हिंदुद्वेष्टे पत्रकार अली सोहराब यांनी ट्वीट केले की, 

या माध्यमातून कनेरिया यांनी मुसलमानांना अपमानित केले आहे. त्यांना शिवी दिली आहे. भारतीय हिंदू त्यांचा जयजयकार करत आहेत.

२. पत्रकार मीर फैजल म्हणाले की,

ईदच्या निमित्ताने पाकिस्तानी हिंदू युद्धाची घोषणा करत असून मुसलमानांना न्यून लेखत आहेत.