पर्यटनस्थळ विकसित करण्याची शासनाची योजना !
मुंबई, २२ एप्रिल (वार्ता.) – अतिक्रमण हटवून आरे दुग्ध वसाहत परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ जणांची समिती स्थापन केली आहे.
पर्यटनमंत्री, आमदार सुनील राणे यांसह नगरविकास, वन, गृहनिर्माण, महसूल, पर्यटन, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुग्ध व्यवसाय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आदी विविध विभागांच्या अधिकार्यांचा या समितीमध्ये समावेश केला आहे. येथील अतिक्रमण हटवून ती जागा सार्वजनिक हितासाठी उपलब्ध करून देणार आहे, तसेच अधिकृत रहिवाशांना सरकारकडून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर येथील विकासाचे धोरण निश्चित केले जाणार आहे.