जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्‍या सूचीत वडापाव १३ व्‍या स्‍थानी !  

येथील रस्‍त्‍यारस्‍त्‍यांवर मिळणार्‍या वडापावला जागतिक मान्‍यता मिळाली आहे. जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्‍या सूचीत वडापावला १३ व्‍या क्रमांकावर स्‍थान मिळाले आहे. ‘टेस्‍ट अ‍ॅटलस’ या ‘जागतिक फूड ट्रॅव्‍हल गाईड’ने हे सर्वेक्षण केले आहे.

देश हिंदु राष्‍ट्र होईल, तेव्‍हाच सावरकरांचे स्‍वप्‍न पूर्ण होईल ! – अभिनेते शरद पोंक्षे

हिंदूंनो, हिंदु धर्म आणि हिंदुत्‍व यांना मोडून काढण्‍याच्‍या षड्‍यंत्राला विरोध करा !

एस्.टी. महामंडळात येणार ८ सहस्र वातानुकूलित गाड्या ! – शेखर चन्‍ने, व्‍यवस्‍थापकीय संचालक, राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ

‘खासगी ट्रॅव्‍हल्‍स’प्रमाणे दर्जेदार सुविधा देण्‍यासाठी एस्.टी. महामंडळ करणार प्रयत्न !

वढुबुद्रुक येथून ज्‍वाला सांगलीत दाखल !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या बलीदानाच्‍या स्‍मरणार्थ बलीदानमासाच्‍या अखेरीस प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या प्रतिकात्‍मक चितेला अग्‍नि देण्‍यात येतो.

आमदार गणेश नाईक यांच्‍या पाठपुराव्‍याने दलित वस्‍त्‍यांमध्‍ये ४ कोटी रुपयांची विकासकामे होणार !

आता ४ कोटी रुपयांच्‍या निधीतून ऐरोली मतदारसंघातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्‍त्‍यांचा विकास होणार आहे. तेथे मूलभूत सुविधा पुरवण्‍यात येणार आहेत.

१४ ते १८ मार्च या कालावधीत शिवतीर्थावर ‘जाणता राजा’ महानाट्याचे सादरीकरण !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जन्‍मापूर्वीचा महाराष्‍ट्र ते छत्रपतींचा राज्‍याभिषेक या दोन महत्त्वाच्‍या घटनांमधील हे महानाट्य आहे. ८० फूट लांब आणि ४० फूट रुंद असलेल्‍या प्रशस्‍त रंगमंचावर हत्ती, घोडे आणि २०० कलाकारांसह हे महानाट्य साकारले जाईल.

अभाविपच्‍या ‘युथ लीडर्स समिट’साठी जिल्‍ह्यातील विविध महाविद्यालयांतील ७०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी !

आगामी काळात विद्यार्थी परिषदेच्‍या माध्‍यमातून राबवण्‍यात येणार्‍या कार्यक्रम-उपक्रम यांची माहिती जिल्‍हा संयोजक दर्शन मुंदडा यांनी दिली. संमेलनाच्‍या शेवटी बालगंधर्व नाट्यमंदिर ते किसान चौक अशी शोभायात्रा काढण्‍यात आली.

सेवा हाच माणुसकीचा धर्म ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

एकांतात आत्‍मसाधना आणि लोकांतात परोपकार सेवा ही साधना आहे. सर्वांग सुंदर समाजाकडून जगाची सर्व प्रकारची सेवा सामर्थ्‍याने आणि सद़्‍भावनेने होईल. त्‍यातून विश्‍वशांतीचे साम्राज्‍य उभे राहील.

‘लोकसेवा फाऊंडेशन’च्‍या पुढाकाराने हिंदु देवतांच्‍या ४ सहस्रांहून अधिक प्रतिमांचे विधीवत् अग्‍निसमर्पण !

शहरातील विविध भागांत, रस्‍त्‍याच्‍या शेजारी, झाडाखाली, मंदिर परिसरात ठेवण्‍यात आलेल्‍या हिंदु देवतांच्‍या ४ सहस्रांहून अधिक प्रतिमा एकत्र करून ‘लोकसेवा फाऊंडेशन’च्‍या पुढाकाराने त्‍यांचे बसव कॉलनी परिसरात विधीवत् अग्‍निसमर्पण करण्‍यात आले.

न्‍यायालय आणि गोवंश हत्‍याबंदी !

देशात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू करण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करून गोसंवर्धनाच्‍या द़ृष्‍टीने पावले उचलावीत !