सांगली – कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या श्रीराममंदिर, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पादुका मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याला प्रधान संकल्प मातृकापूजन उदक शांतीने प्रारंभ झाला. मुख्य मूर्ती प्रतिष्ठापना आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा १३ मार्चला श्री संस्थान संकेश्वर मठाचे श्रीमद् जगदगुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह भारतीस्वामी, राजस्थानचे स्वामी संपतकुमार अधेशाचार्य महाराज, ह.भ.प. गुरुनाथ कोटणीस महाराज यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त प्रदीप सव्वाशे, संगीता सव्वाशे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. ९ मार्चला भजन, गायनसेवा, सामुदायिक गीतापठण, गीतरामायण झाले.
२. १० मार्चला धार्मिक विधी झाले आणि ‘गुरुकुल संस्कार केंद्रा’च्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक गीतापठण केले.
३. ११ आणि १२ मार्चला विविध कार्यक्रम झाले. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी विविध संत, मठाधिपती उपस्थित रहाणार आहेत.
४. या सोहळ्याच्या निमित्ताने १३ मार्चला सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा १ कोटी २५ लाख ते ३ कोटी ५० लाख नामस्मरण जपसंख्या करण्यात येणार आहे. त्यासाठी १ सहस्र ५०० श्रीरामभक्तांची आवश्यकता आहे. तरी यात अधिकाधिक भक्तांनी सहभागी व्हावे.