जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांचा मोर्चा !

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांचा मोर्चा

सांगली – राज्य सरकारने जुनी सेवानिवृत्त योजना बंद केली आहे. यामुळे सरकारी कर्मचारी अनेक लाभांपासून वंचित रहात असल्याने सरकारने परत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी १२ मार्च या दिवशी सांगली येथे पुष्पराज चौक ते स्टेशन चौक असा भव्य मोर्चा काढला. भर उन्हात आणि मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी या मोर्च्यात सहभागी झाले होते. या वेळी कर्मचार्‍यांनी ‘जुनी निवृत्तीवेतन योजना लागू झालीच पाहिजे’, अशा जोरदार घोषणा दिल्या.