सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार अल्प करण्याच्या विधेयकाला विरोध
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सरकारच्या विरोधात ५ लाख लोकांनी येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आतापर्यंतचे हे सर्वांत मोठा आंदोलन आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार अल्प करून संसदेला न्यायालयाचे निकाल पालटण्याचा अधिकार देण्याच्या विधेयकाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात होते. विशेष म्हणजे या आंदोलनात सामान्य नागरिकच नाही, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी, उद्योगपती आदीही सहभागी झाले आहेत. राजधानी तेल अविव येथील आंदोलनात पोलीस प्रमुख एमिशाई अशेद हे सहभागी झाले होते. या घटनेनंतर अशेद यांचे स्थानांतर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सरकारला चेतावणी दिली आहे की, जर त्यांनी विधेयक मागे घेतले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
सौजन्य : The Telegraph
लोकांचे म्हणणे आहे की, हे विधेयक संमत झाले, तर संसदेला अधिक अधिकार मिळतील आणि त्याचा बहुमत असणारे सरकार दुरुपयोग करील. नागरिकांच्या अधिकारांवर बंधने येतील. न्यायालयाची शक्ती क्षीण होईल. कोणताही कायदा रहित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार सीमित होईल.