देहलीतील न्यायालयाच्या आवारात बार असोसिएशनच्या होळीच्या कार्यक्रमात अश्‍लील नाच !

देहली उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधिशांकडे मागितला अहवाल !

नवी देहली – देहलीतील पटियाला हाऊस न्यायालयाच्या परिसरात होळी मिलन समारंभाच्या वेळी देहली बार असोशिएशनच्या कार्यक्रमात अश्‍लील नाच सादर करण्यात आला. याची देहली उच्च न्यायालयाने गंभीर नोंद घेत जिल्हा न्यायाधिशांकडून अहवाल मागवला आहे.

या प्रकरणी उच्च न्यायालयाने म्हटले की, न्यायालयाच्या परिसरात झालेला हा नाच योग्य नव्हता आणि त्या कार्यक्रमाचे समर्थन करता येणार नाही. यामुळे न्यायव्यवस्थेला गालबोट लागले आहे. अशा गोष्टींमुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन झाली आहे. हे प्रकरण पूर्णपणे निकाली काढले जात नाही, तोपर्यंत नवी देहली बार असोसिएशनची सध्याची कार्यकारिणी त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी न्यायालयाच्या जागेचा वापर करू शकणार नाही.

संपादकीय भूमिका

  • व्यक्ती सुशिक्षित झाली, तिने एखादी पदवीही मिळवली; म्हणजे ती सुसंस्कृत आणि नीतीमान झाली, असे म्हणता येत नाही, हेच या घटनेवरून लक्षात येते !  संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जनतेने केली, तर त्यात चूक ते काय ?