म्हशीला काठीने मारल्यावरून संभल (उत्तरप्रदेश) येथे हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार !

संभल (उत्तरप्रदेश) – येथील कमालपूर गावात एका म्हशीला काठीने मारल्यावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला. यात ६ जण घायाळ झाले. मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली आहे. येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.