(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राप्रमाणे मुसलमानही इस्लामी राष्ट्राची मागणी करू लागले तर . . ?’ – मौलाना तौकीर रझा

  •  . . . तर खलिस्तानची मागणीही योग्य ठरेल ! – रझा यांचा दावा

  • मुसलमानही इस्लामी राष्ट्राची मागणी करू लागले, तर काय होईल ? – रझा यांचा प्रश्‍न 

मौलाना तौकीर रझा

रामपूर (उत्तरप्रदेश) – जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणी करणार्‍यांचीही मागणी योग्य आहे. त्यांची बाजू घेतली, तर आमचे मुसलमान तरुण उभे रहातील आणि त्यांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ? यासाठी आपल्याला देशाची आणखी एक फाळणी होऊ देऊ नये, असे विधान इत्तेहाद मिल्लत कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) तौकीर रझा यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. मुरादाबादमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांच्या विरोधात बोलतांना त्यांनी हे विधान केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धृतराष्ट्र’ असेही म्हटले. ‘विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल या आतंकवादी संघटना आहेत’, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

१. मौलाना रझा पुढे म्हणाले की, ज्या प्रमाणे खलिस्तानची मागणी करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कारवाई केली जात आहे, तशीच कारवाई हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांवर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा असे समजले जाईल की, हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांवर कारवाई होत नाही, तर खलिस्तानची मागणी करणे योग्य आहे.

२. मौलाना रझा यांनी आरोप केला की, नरेंद्र मोदी सरकार सातत्याने मुसलमान आणि इस्लाम यांच्या शत्रूंची पाठ थोपटत आहेत.

३. मोदी सरकार त्यांचीच पाठ थोपटतात, जे इस्लामचे शत्रू आहेत. ते आमचा आवाज ऐकणार नसल्याने राष्ट्रपतींनी आमचा आवाज ऐकावा, असेही रझा या वेळी म्हणाले.

(म्हणे) ‘१० लाख मुसलमान तरुणींचे हिंदु संघटनांकडून अपहरण करून धर्मांतर !’

मौलाना तौकीर रझा यांनी दावा केला की, एका सर्वेक्षणानुसार सुमारे १० लाख मुसलमान तरुणींचे हिंदु संघटनांनी अपहरण करून धमकावरून धर्मांतर केले आहे. याला त्यांनी घरवापसी असे नाव दिले आहे. ते या तरुणींचे हिंदु तरुणांशी विवाहही करवून दिले आहे.  यामुळे त्यांनी हिंदु धर्माची हानी केली आहे.

मुसलमान नाही, तर आता सत्तेत असणारे बाँब फोडत होते !

रझा यांनी आरोप करतांना म्हटले की, मुसलमान पूर्वीही बाँब फोडत नव्हता आणि आजही फोडत नाही. जे बाँब फोडत होते ते हिंदु समाजाची दिशाभूल करत होते की, ‘मुसलमान बाँब फोडतात.’ खरे तर हेच लोक बाँब फोडत होते जे आज सरकारमध्ये बसले आहेत. देशात आता दंगली होत नाहीत कारण दंगल करणारे सत्तेत आहेत. (अशा प्रकारचे हास्यास्पद आरोप करून रझा धर्मांध आणि जिहादी लोकांना पाठीशी घालत आहेत. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • जगत इस्लामी, ख्रिस्ती, ज्यू आणि बौद्ध राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटी लोकसंख्या असणार्‍या हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. जर त्यांनी ते स्थापन केले, तर त्यात चूक काय ?
  • खलिस्तानची मागणी ही फुटीरतावादी मागणी आहे, त्याच्याशी हिंदु राष्ट्राच्या मागणीची तुलना कदापी होऊ शकणार नाही ! तौफीर रझा यांच्यासारखे लोक जाणीवपूर्वक अशी विधाने करून हिंदु आणि शीख यांच्यात फूट पाडत आहेत. अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे !
  • मुसलमानांना यापूर्वीच एक देश दिलेला आहे. त्यांनी भारतात पुन्हा अशी मागणी करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारने त्यांना दिवाळखोर पाकिस्तानमध्ये हाकलून द्यावे, अशीच मागणी राष्ट्राभिमानी हिंदू करतील !