बंगालमध्ये ‘वंदे भारत एक्सप्रेस’वर तिसर्‍यांदा दगडफेक

तिसर्‍यांदा दगडफेक : प्रवाशांमध्ये भीती !

‘वंदे भारत एक्सप्रेस’वर झालेली दगडफेक

मुर्शिदाबाद (बंगाल) – येथे न्यू जलपाईगुडी येथून हावडा येथे जाणार्‍या ‘वंदे भारत एक्सप्रेस’वर फरक्का पुलाजवळ दगडफेक करण्यात आली. यामुळे एका डब्याच्या खिडक्यांचा काचा फुटल्या. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२२ पासून या गाडीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत या गाडीवर ३ वेळ दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांनी म्हटले की, सातत्याने या गाडीवर होणार्‍या दगडफेकीच्या घटनांमुळे आता भीती वाटू लागली आहे.

संपादकीय भूमिका

  • बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे !