कर्णावती येथील भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या वेळी घातपात करण्याची खलिस्तान्यांची धमकी !

मध्यप्रदेशातून २ जणांना अटक  

प्रतिकात्मक छायाचित्र

कर्णावती (गुजरात) – येथे सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात चौथा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याच्या वेळी घातपात करण्याच्या धमकीचे संदेश ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घातलण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह याच्या नावाने प्रसारित झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथील स्टेडियमचे संरक्षण वाढवण्यात आले आहे. यासह कर्णावती पोलिसांनी मध्यप्रदेशातून २ आरोपींना अटक केली आहे. या धमक्या ‘सिम बॉक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून दिल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज कर्णावतीमध्ये होते, तेव्हाच या धमक्या दिल्या जात होत्या.

संपादकीय भूमिका

  • खलिस्तान्यांची वाढती वळवळ कधी चिरडली जाणार ?