राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील घरावर ‘ईडी’ची धाड !

ईडी’ची पुन्हा रेड !

कोल्हापूर – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ११ मार्चला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी धाड घातली. २ मासांत ‘ईडी’ने मुश्रीफ यांच्यावर केलेली ही तिसरी कारवाई आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरण, आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स आस्थापनाने चालवण्यास घेण्याचे प्रकरण, ‘गोडसाखर’ साखर कारखान्यात अवैध गुंतवणुकीचे आरोप यांसह अन्य आरोपांच्या प्रकरणी हसन मुश्रीफ यांचे अन्वेषण चालू आहे.

(सौजन्य : TV9 MARATHI) 

हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडल्याचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून घोषणा दिल्या – 

१. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी कागल पोलीस, तसेच केंद्रीय पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. एका कार्यकर्त्याने स्वत:चे डोके भूमीवर आपटून घेतल्याने तो रक्तबंबाळ झाला.

२. ‘सारखे-सारखे येऊन त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला’, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने दिली आहे.

३. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘अनिल देशमुख यांच्या प्रकरणी ईडी आणि अन्य केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून १०९ वेळा धाडी घालण्यात आल्या होत्या.

हा विक्रम ‘ईडी’ला मोडायचा असेल; म्हणून सारख्या-सारख्या धाडी घालत असतील. केंद्र सरकारकडून विरोधकांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे.’’