नागपूर – पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे पुनर्नामकरण करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. त्यास तात्काळ संमतीही देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ११० अन्वये पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्रशासनाला करण्याचा ठराव या वेळी संमत केला आहे.