टिकैत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक

अटक करण्यात आलेला आरोपी विशाल

नवी देहली – भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी राकेश टिकैत आणि त्यांचे कुटुंब यांना बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला पोलिसांनी देहलीतून अटक केली आहे. आरोपी विशाल हा देहलीतील नजफगड येथील रहिवासी आहे.

विशाल याने पोलीस अन्वेषणात सांगितले की, तो टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात टिकैत यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात खलिस्तानवादी सहभागी झाल्याचे समोर आले होते.