चौकशीसाठी स्थापन झालेल्या संसदीय समितीवर आक्रमण

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण

अगरताला (त्रिपुरा) – त्रिपुरा राज्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीवर विशालगड या भागात आक्रमण करण्यात आले. काँग्रेस आणि माकप यांनी हे आक्रमण  भाजपच्या समर्थकांनी केल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आक्रमणाच्या वेळी पोलिसांनी तात्काळ समितीतील सदस्यांचे रक्षण केले. या आक्रमणात कुणीही घायाळ झालेले नाही. २-३ वाहनांची हानी झाली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला कह्यात घेण्यात आले असून अन्य जणांचा शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

भाजप शासित राज्यात अशी स्थिती असणे अपेक्षित नाही !