पाकमधील शाळकरी मुलांना दिले जाते भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण !

युवापिढीवर भारतद्वेषाचे कुसंस्कार करणारा पाक !

नवी देहली – पाकमधील शाळकरी मुलांना भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण दिले जात आहे. इयत्ता १० वीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारत आणि हिंदू यांच्यावर अनेक चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. या पाठ्यपुस्तकामध्ये म्हटले आहे की, भारताने सातत्याने अणूचाचण्या केल्या. त्यामुळे या भागातील संतुलन बिघडले. हिंदूंनी मुसलमानांचा नरसंहार केला. भारताला ‘काश्मीर प्रश्‍न सुटावा’, असे वाटत नाही, असे आरोप करून शाळकरी मुलांना हिंदुद्वेष आणि भारतद्वेष यांचे धडे शिकवले जात आहेत. या पुस्तकात म्हटले आहे की, काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी नवाझ शरीफ सरकारने अनेक वेळा प्रयत्न केले. त्यासाठी भारताला अधिकृत निमंत्रण देण्यात आले; मात्र भारतामुळे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. पुस्तकात भारताला ‘अहंकारी’ म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

पाकमधील जनता हिंदुविरोधी आणि भारतविरोधी असण्यामागे हे एक कारण आहे. पाकशी मैत्री करण्याची इच्छा बाळगणार्‍या भारतातील पाकप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ?