सभेविषयी अपप्रचार आणि जातीय तेढ निर्माण करणार्‍या एस्.डी.पी.आय. विरुद्ध कायदेशीर कारवाई करा !

मंगळुरू येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला विरोध केल्याच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन !

सौदी अरेबियामध्ये रमझानच्या काळात मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर बंदी !

सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्‍या रमझान मासाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात कधीतरी असे होईल का ?

पाकिस्तानच्या ‘नॅशनल डे परेड’वर बिकट आर्थिक स्थितीचे सावट !

ही परेड केवळ प्रतिकात्मक असेल. या वेळी कुठल्याही विदेशी पाहुण्याला निमंत्रित केले जाणार नाही. ‘नॅशनल डे परेड’मध्ये पाकिस्तानी सैन्य त्याचे सामर्थ्य दाखवत असते.

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाची पंतप्रधान प्रचंड यांना कारणे दाखवा नोटीस !

माओवादी हिंसाचारात ५ सहस्र लोकांच्या मृत्यूचे प्रकरण

हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांतर करून विवाह करण्यासाठी मुसलमानाकडून दबाव !

पीडित मुलीने पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर आरोपी तरुणाने त्याच्या कुटुंबियांसह पीडित तरुणी आणि तिचा भाऊ यांना बेदम मारहाण केली. यातून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो. कायद्याचे भय न राहिलेल्या अशांना कारागृहात टाका !

गोवा : पैशांच्या लोभापायी पेडणे येथे देवस्थानच्या भूमीही विकण्याचा घाट

गावाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपली संस्कृती आणि परंपरा ही मंदिरांवर अवलंबून आहे. अलीकडील काही मासांमध्ये देवस्थानच्या भूमी विकण्याचा घाट घातला जात आहे.

हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने सरंबळ, कुडाळ येथे २४ कुंडी गायत्री महायज्ञाचे आयोजन

१२ मार्च या दिवशी सकाळी ७ वाजता ध्यान, प्रज्ञायोग, संस्कार गायत्री महायज्ञाची पूर्णाहुतीने सांगता होणार आहे. यापुढील महायज्ञ १३ मार्चला राजापूर, १७ मार्चला रत्नागिरी आणि २२ मार्चला चिपळूण येथे होणार आहे.

हज समितीच्या अध्यक्षांना मंत्रीपदाचा दर्जा देणार नाही ! – सरकारचे स्पष्टीकरण

सरकारच्या निर्णयावर राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ यांनी तीव्र आक्षेप नोंदवून सरकारने निर्णयाविषयी फेरविचार करण्याची मागणी केली होती.

म्हादई अभयारण्यासह अन्य वनक्षेत्रात अजूनही आग

म्हादई अभयारण्यासह अन्य वनक्षेत्रात आग १० मार्च म्हणजे सहाव्या दिवशीही धुमसत होती. विझवलेल्या ठिकाणी आग पुन्हा लागण्याचे प्रकार घडत आहेत, त्यावरही देखरेख ठेवली जात आहे.

दिवा -रत्नागिरी पॅसेंजर १५ मार्चपासून होणार अधिक वेगवान

कोकण रेल्वेने सुधारित दिलेल्या वेळापत्रकानुसार दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी गाडी दिवा येथून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार आहे. पूर्वी ही गाडी रात्री २ वाजता पोचत होती.