बीजिंग (चीन) – चीनच्या पंतप्रधानपदी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे विश्वासू ली किआंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चीनच्या राजकीय व्यवस्थेत हे पद दुसर्या स्थानाचे आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या २ सहस्र ९३६ सदस्यांनी ली कियांग यांच्या समर्थनार्थ मतदान केले, तर ३ जणांनी विरोधात मतदान केले.
Li Qiang, Xi confidant, takes reins as China's premier https://t.co/vBEBNQ46Ks pic.twitter.com/8jKkTVpf9N
— Reuters Asia (@ReutersAsia) March 11, 2023
चीनची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे दायित्व ली किंअंग यांच्यावर असणार आहे. किआंग हे चीनमध्ये व्यवसायासाठी अनुकूल मानले जात असले, तरी चीनमध्ये शून्य कोविड धोरणाचे प्रणेते तेच आहेत. ही योजना अयशस्वी झाली, तरीही केवळ शी जिनपिंग यांच्या विश्वासातील असल्याने त्यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले आहे.