एस्.डी.पी.आय.कडून कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांना निवेदन !
मंगळुरू (कर्नाटक) – येथे उद्या, १२ मार्च या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा सरचिटणीस इलियास महंमद तुंबे याने कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांकडे सभेच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तुंबे याने महासंचालकांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करणे, हे आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या विरोधात असून देशाची धर्मनिरपेक्ष परंपरा नष्ट करण्याचा हा सुनियोजित कट आहे. कोणत्याही धर्मानुसार हा देश घडवण्याचा प्रयत्न करणे, हा देशद्रोह आहे. या देशाने पाहिले आहे की, कुणी इस्लामी देश, ख्रिस्ती देश किंवा बौद्ध देश वगैरे घोषित केले, तर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला प्रविष्ट केला जातो; मात्र हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी याआधीही हिंदु राष्ट्र सभा घेतल्या गेल्या आहेत; मात्र त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. आता अशाच सभेची भित्तीपत्रके शहरात सर्रास लावली जात आहेत आणि तरीही पोलिसांनी आयोजकांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, हे चिंताजनक आहे. मी पोलीस महासंचालकांना विनंती करतो की, या सभेच्या आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
संपादकीय भूमिका
|