अहिल्यानगर जिल्हा गोहत्यामुक्त करणार ! – आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा गोहत्यामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार, याचसमवेत गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद केले जातात. त्यांच्यावर प्राणघातक आक्रमणे होतात, यासाठीही उपाययोजना करू. राज्यशासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. या गोमातेसाठी वेळप्रसंगी प्राणाची आहुती द्यावी लागली, तरी मागे हटणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.

अहिल्यानगर शहरात गेल्या महिन्याभरापासून गोहत्या करणार्‍यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना, बजरंग दल आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला अन् पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचा सन्मान करण्यात आला.