रत्नागिरी : जिल्ह्यात ३२३ गावांत जनावरांना झाली होती ‘लम्पी’ची लागण

राज्यात सर्वत्र लम्पीची लागण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही ३ सहस्र १०० गोवंशियांना लम्पीची लागण झाली होती. आतापर्यंत २ सहस्र २०० गोवंशियांवर उपचार होऊन ती आता बरी झाली आहेत. तर ४०० गोवंशियांवर अद्यापही उपचार चालू आहेत.

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाजवळ आजपासून बेमुदत उपोषण !

अनधिकृत बांधकामापासून गडाचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शिवप्रेमींना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून सी.आर्.पी.सी. कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली, हे दुर्दैवी आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

नैतिक अध:पतन रोखण्यासाठी समाजात नैतिकतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे ! विद्येचे मंदिर असलेल्या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणे हे अशोभनीय !

इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर केलेल्या आक्रमणात ५ जण ठार

दीड मासापूर्वी इस्रायलने दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले होते. त्यात २ सैनिकांसह ४ नागरिक ठार झाले होते.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी !

चेंबूरमधील भूलिंगेश्वर येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन सनातनच्या ग्रंथांविषयीची विस्तृत माहिती साधकांकडून जाणून घेतांना ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर

वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मिहानमध्ये १ लाख तरुणांना देणार रोजगार ! -नितीन गडकरी

प्लास्टिकपासून क्रूड पेट्रोल काढण्याचा नवीन प्रकल्प मी चालू करत आहे. ३ मासांत प्रकल्प चालू होईल. हे पेट्रोल डिझेलमध्ये वापरता येईल. त्यावर ट्रक आणि बस चालू शकेल.

महान भारताचा गौरव विद्यार्थ्यांच्या हातात आहे ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

विद्यार्थ्यांनो, ‘घरातून बाहेर जातांना आई-वडिलांच्या पाया पडूनच बाहेर पडणार’, ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाही’, ‘ताटात अन्न टाकून देणार नाही’, असे लहान लहान संकल्प करा.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे बोट धरूनच मी पुढे जात आहे ! – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व युगांमध्ये आदरणीय आहेत. त्यांनी सार्वभौमत्व आणि समता यांचे दिलेले विचार आजही मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय लवकरच खुले होईल.

अतीवृष्टी अनुदान घोटाळ्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वैजापूर तहसीलदारांना जिल्हाधिकार्‍यांची कारणे दाखवा नोटीस !

शेतकर्‍यांना दोनदा अनुदान वाटपप्रकरणी तहसीलदार गायकवाड हे दोषी असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची वरवरची कारवाई करण्यापेक्षा कठोर कारवाई करणे आवश्यक !

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचार्‍यांचा आजपासून अनिश्चित काळासाठी संप !

‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक कृती समिती’ने चालू केलेल्या संपामुळे विद्यापीठ स्तरावर होणार्‍या सर्वच परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.