पूर्णवादाचे सिद्धांत समाधान मिळवून देतात ! – अमोघ गीद

मार्गदर्शन करतांना अमोघ गीद

नगर – पूर्णवादाच्या सिद्धांताचा अवलंब केला, तर मानवाला मनासारखे जीवन जगता येते. जीवन समाधानी होते. पूर्णवाद सिद्धांत संस्कृत विद्यापिठासह विद्वानांनी मान्य केलेले आहेत. ते संगणकयुगातही उपयुक्त आहेत, याची प्रचीती देश-विदेशातील श्रद्धावंतांना आलेली आहे, असे प्रतिपादन विमल पब्लिशर्स प्रा.लि.चे संचालक श्री. अमोघ गीद यांनी केले. येथील सनातन धर्मसभा आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे पुष्प गुंफतांना ‘पूर्णवादी ग्रंथसंपदा-एक सामाजिक बंध’ या विषयावर ते बोलत होते. धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती श्री. दत्तोपंत पाठकगुरुजी यांनी स्वागत केले. पूर्णवाद विश्व विद्यापिठाचे कार्यकर्ते श्री. समीर शनवारे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.

सनातन धर्मसभेचे कोषाध्यक्ष श्री. निळकंठराव देशमुख यांनी आभार मानतांना ‘पूर्णवादाच्या ग्रंथसंपदेचा उत्तम परिचय करून दिलात’, असे सांगितले. कार्यक्रमास शहरातील पूर्णवाद प्रेमींसह भाविक आणि सनातन धर्मसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.