सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाजवळ आजपासून बेमुदत उपोषण !

अवैध उत्खनन आणि बांधकाम करणार्‍यांवर कारवाईची मागणी

वेंगुर्ला – संरक्षित स्मारक असलेल्या तालुक्यातील यशवंतगडाच्या तटबंदीला लागून अवैधरित्या करण्यात आलेले उत्खनन आणि आर्.सी.सी. बांधकाम यांना उत्तरदायी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील शिवप्रेमी तथा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण प्रांताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर आणि भूषण मांजरेकर हे २० फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

यशवंतगडाच्या तटबंदीला लागून अवैधरित्या करण्यात आलेले उत्खनन आणि आर्.सी.सी. बांधकाम

याविषयी राजन रेडकर यांनी सांगितले की, यशवंतगडाजवळ झालेले अवैध उत्खनन आणि बांधकाम याकडे रेडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तसेच वेंगुर्ला तहसीलदार, शिरोडा मंडळ अधिकारी, रेडीचे तलाठी, कोतवाल, साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग (रत्नागिरी) यांनी दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई केली नाही. याउलट अनधिकृत बांधकामापासून गडाचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शिवप्रेमींना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून सी.आर्.पी.सी. कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली, हे दुर्दैवी आहे. आमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होण्याची शक्यता असल्याने आम्हाला संरक्षण द्यावे, असे निवेदन आम्ही वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिले आहे.


हे पण वाचा आणि पहा –

रेडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील यशवंतगडाला अवैध बांधकामामुळे धोका !
https://sanatanprabhat.org/marathi/653643.html

यशवंतगडाच्या शेजारी चालू असलेल्या बांधकामाला ग्रामपंचायतीची अनुमती नाही !
https://sanatanprabhat.org/marathi/654363.html

गडदुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण नियोजित षड्यंत्र असल्याने पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
https://sanatanprabhat.org/marathi/654363.html

Yashwantgad in Redi (Sindhudurg, Maharashtra) vulnerable illegal construction !
https://www.hindujagruti.org/news/175528.html