पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीच्या निमित्ताने १२ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड आकुर्डी, रावेत, हिंजवडी, पुनावळे, वाकड, थेरगाव आदी २६ ठिकाणी नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. या वर्षी संघाने १०० व्या वर्षांत पदार्पण केले असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी केली आणि स्वागत केले.