पाकमध्ये तालिबानी आतंकवादी संघटना आणि पोलीस यांच्यात चकमक

पाकच्या खैबर पख्तुख्वा प्रांतातील तोरखम येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही आतंकवादी संघटना आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. टीटीपीने गेल्या मासाभरात पोलिसांवर ३ मोठी आक्रमणे केली.

१० वर्षे जुने आधारकार्ड अद्ययावत करण्याचे ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’चे आवाहन !

‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण’ म्हणजेच ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ या संस्थेकडे सर्व नागरिकांच्या आधारकार्डची माहिती संकलित करण्याचे दायित्व आहे.

चारधाम यात्रेच्या ऑनलाइन आरक्षणाला प्रारंभ

चारधाम यात्रेच्या ऑनलाइन आरक्षणाला २० फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला आहे. २५ एप्रिलला केदारनाथ धामची, तर २७ एप्रिलला बद्रीनाथ धामची कवाडे (मुख्य द्वार) उघडणार आहेत.

असदुद्दीन ओवैसी यांच्या देहली येथील घरावर अज्ञातांकडून दगडफेक

यात त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

बागेश्वरधामच्या दरबारात २२० धर्मांतरितांची हिंदु धर्मात ‘घरवापसी’ !

बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता.

तालिबानी कायद्यांनी विधवा महिलांना ढकलले दारिद्र्याच्या खोल दरीत !

एरव्ही महिला अधिकाराच्या नावाखाली हिंदु परंपरांच्या विरोधात टाहो फोडणारे कथित महिला अधिकारवाले हे तालिबानी जाचाच्या विरोधात कधीच ‘ब्र’ही काढत नाहीत ! यातून त्यांचा दुटप्पीपणा लक्षात येतो !

आयफोनसाठी तरुणाने ऑनलाईन मागवलेले साहित्य पोचवणार्‍या तरुणाची केली हत्या !

तरुण पिढीवर योग्य संस्कार होत नसल्याचाच हा परिणाम आहे ! याला सर्वपक्षीय शासनकर्ते, पालक आणि समाज उत्तरदायी आहेत !

झाडगाव (रत्नागिरी) येथे २३ फेब्रुवारीपासून वेदशाळा आणि संस्कृत पाठशाळेत धार्मिक कार्यक्रम

वेद आणि शास्त्र या विषयातील २ दिग्गज (कै.) विनायक आठल्येगुरुजी अन् व्याकरणाचार्य (कै.) पु.ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झाडगाव येथील संस्कृत पाठशाळेमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन !

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांचा पोलिसांकडून गौरव

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान गेल्या १२ वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका सेवा देत आहे. संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका असून महाराष्ट्राच्या हद्दीतील विविध महामार्गावर अविरत सेवा बजावीत आहे. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.