ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात विजयादशमीचा उत्सव साजरा करून घरी परतत असतांना दोन हिंदु युवतींची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती ‘इस्कॉन’ या संस्थेचे प्रवक्ते श्री. राधारमण दास यांनी ‘एक्स’वरून दिली. या पोस्टला त्यांनी दोघा हिंदु मुलींचे छायाचित्रही जोडले आहे.
Brutal murder of 2 Hindu girls returning home on #Vijayadashami night in Bangladesh
Let alone protecting Hindus when they are being hunted down and killed in #Bangladesh but on the contrary, it is incomprehensible that Bangladeshi cricketers are provided with five-star… pic.twitter.com/aguxaVd5Cc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 15, 2024
दास पुढे म्हणाले की, बांगलादेशातील काळजीवाहू सरकार हिंदूंचा संघर्ष आणि विनवण्या यांच्याकडे कानाडोळा करत आहे. दुसरीकडे भारत हा बांगलादेशी क्रिकेटपटूंना ‘फाइव्ह स्टार’ सुविधा देण्यात व्यस्त आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी हे लज्जास्पद आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात हिंदूंना वेचून ठार मारले जात असतांना त्यांचे रक्षण करणे सोडाच; पण उलट बांगलादेशाच्या क्रिकेटपटूंना भारतात क्रिकेट खेळ्यासाठी पायघड्या घालून त्यांना पंचतारांकित सुविधा पुरवली जाणे अनाकलनीय आहे ! त्यामुळे आता १०० कोटी हिंदूंनी आपल्या धर्मबांधवांच्या रक्षणार्थ पुढे आले पाहिजे ! |