सोलापूर येथे ५२ वे भव्य श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन !

श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समिती आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा सोलापूर अन् जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवाब मलिक यांच्या जामिनासाठी तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या जामिनावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ६ जानेवारी २०२३ या दिवशी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होणार आहे.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

नवी मुंबईत सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून मोठा मोर्चा काढायला हवा. ‘त्याद्वारे गोहत्या आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी आपण शासनाला सांगू शकतो’, असेही मत अनेकांनी मांडले. 

आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाड्यातील १५ लाख शेतकरी कुटुंबांचा होणार सर्वे !

यापूर्वी प्रशासनाने अनेक वेळा शेतकरी कुटुंबाचा सर्वे घेतला होता, त्याचे काय झाले, हेही शेतकर्‍यांना समजले पाहिजे. त्यामुळे आता सर्वे करण्यासमवेत त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे.

श्री स्वामी समर्थ भक्तांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक !

भक्तनिवास नोंदणीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. मागील एक मासामध्ये अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील भक्तांची फसवणूक झाली आहे.

नावात बरेच काही आहे !

परकीय आक्रमकांनी बाटवलेली शहरांची नावे पालटली की, मोठा गदारोळ चालू होतो. प्रत्यक्षात आक्रमकांनी आपल्या संस्कृतीवर किती खोलवर आक्रमण केले आहे, त्याची व्याप्ती धक्कादायक आहे. मंदिरे पाडली, मूर्तीभंजन केले, शहरांची नावे पालटली यांसह मंदिरांत होणार्‍या विधींचीही नावे पालटली….

भिवंडी येथे ‘ए.टी.एम्.’ यंत्र फोडल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

भिवंडी येथील पूर्णा परिसरातील एका खासगी अधिकोषाचे ‘ए.टी.एम्.’ यंत्र गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्यात आले. चोरांनी किती रक्कम चोरली, याचा आकडा समजलेला नाही. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मांढरदेव (सातारा) येथील काळूबाई मंदिरात रक्कम मोजणार्‍या निवृत्त बँक कर्मचार्‍यानेच चोरले दीड लाख रुपये आणि दागिने !

भाविकांनी श्रद्धेने मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा अपहार होणे, हे लज्जास्पद आहे. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असायला हवीत, तसेच दोषींवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी !

चोर तो चोर वर शिरजोर !

सरकारी कार्यालयांमध्ये ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे’, असे पत्रक लावलेले असते. ते केवळ औपचारिकता म्हणून नाहीतर सध्या ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.’ पैसे न मोजता एखादे सरकारी काम होऊच शकत नाही, अशी सद्यःस्थिती असतांना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये..