काँग्रेसला जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या भावना कळू न शकल्याचा आरोप !
काँग्रेसच्या अधःपतनाला आरंभ झाला असून असे अशा अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भविष्यात पक्ष सोडल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक
श्रीनगर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांचे पुत्र तथा जम्मू-काश्मीरच्या राजघराण्याचे वंशज विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेस पक्षाचे त्यागपत्र दिले. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात, ‘मी अखिल भारतीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र देत आहे’, असे म्हटले आहे.
I hereby tender my resignation from the Indian National Congress.
My position on critical issues vis-à-vis Jammu & Kashmir which reflect national interests do not align with that of the Congress Party. @INCIndia remains disconnected with ground realities. @INCJammuKashmir pic.twitter.com/g5cACgNf9y
— Vikramaditya Singh (@vikramaditya_JK) March 22, 2022
त्यागपत्रामागचे कारण देतांना ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या भावना आणि आकांक्षा लक्षात घेण्यास आणि त्याप्रमाणे कृती करण्यास काँग्रेस असमर्थ ठरली आहे, असा माझा विश्वास आहे.’’ ते पुढे असेही म्हणाले, ‘‘जम्मू-काश्मीरच्या संदर्भातील गंभीर सूत्रांवर माझी भूमिका काँग्रेस पक्षाशी जुळत नाही. काँग्रेस जम्मू-काश्मीरमधील वास्तव जाणून घेण्यास अपयशी ठरली आहे.’’
#JammuKashmir के सीनियर नेता कर्ण सिंह के बेट विक्रमादित्य ने #Congress से दिया इस्तीफा, नेतृत्व पर उठाए सवाल, बोले- लीडरशिप को ग्राउंड रियलिटी की जानकारी नहीं
देखिये, @ranjeetadadwal की खास बातचीत@JournoAmitSingh #News5G @vikramaditya_JK #KashmiriPandit #JammuKashmir pic.twitter.com/q88lIMtHMf
— Times Now Navbharat (@TNNavbharat) March 23, 2022