-
उडुपी येथील कापु मारीगुडी जत्रेमध्ये मुसलमान व्यापार्यांवर बंदी घातल्याचे प्रकरण
-
हिजाबविषयीच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात व्यापार्यांनीही आंदोलन केल्याने त्यांना हिंदूंच्या जत्रांत व्यापार करण्यास बंदी !
हिंदूंनी रोखठोक पवित्रा घेतल्यास काय होते, हे यावरून दिसून येते ! आता सर्वत्रच हिंदूंनी असा पवित्रा घेतल्यास आश्चर्य वाटू नये !
उडुपी (कर्नाटक) – जिल्ह्यातील कापु मारीगुडी जत्रेसह करावळी उत्सव, रथोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मुसलमान व्यापार्यांना व्यापार करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी रस्त्यावर किरकोळ व्यापार करणारे आणि जत्रेत व्यापार करणार्या संघटनेचे प्रमुख महंमद आरिफ यांनी पत्रकार परिषदेत केली. कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालणे अनिवार्य नसल्याचा निकाल दिल्यावरून राज्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला होता. त्यात हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी दुकाने थाटणार्या मुसलमानांनीही सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या दुकानांना आता अनुमती नाकारण्यात आली आहे.
आरिफ म्हणाले की, अनेक वर्षांपासून हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आम्ही व्यापार करून धार्मिक एकात्मता जपली आहे; परंतु अलीकडे हिंदूंच्या कार्यक्रमात मुसलमान व्यापार्यांवर निर्बंध घालण्यात येत आहेत. हिजाब प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध असमाधान व्यक्त करून मुसलमान व्यापार्यांनी बंद पुकारल्याने हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात निर्बंध घालण्यात आला आहे; परंतु आम्ही सर्व रस्त्यावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी असून आम्ही ‘बंद’ला अनुमोदन दिले नव्हते, तरीही आमच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. हिंदूंच्या भावनांना धक्का लागू नये, असे आम्ही वागत आलो आहोत. पुढेही असेच वागू. एकमेकांना समजून घेऊन, द्वेष सोडून सलोख्याने जीवन जगू.