‘द कश्मीर फाइल्स’ने आता दडपलेला सत्य इतिहास देशासमोर आणण्याला प्रारंभ केला आहे. आता हळूहळू सर्वच इतिहास समोर आणून पीडित हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न होणे हा काळानुसार होत असलेला पालटच होय ! – संपादक
मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारावरील चित्रपट गाजत असतांना आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवण्यात येणार आहे. निर्माते विपुल शहा यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. विपुल शहा यांनी सांगितले, ‘सत्य कथेवर आधारित ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बनवत आहेत. हा चित्रपट बेपत्ता झालेल्या ३२ सहस्र मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत.’
The Kerala Story movie is crucial as radicals attempt making Kerala a Muslim state https://t.co/EptHA7eyBa #Kerala
— Oneindia News (@Oneindia) March 23, 2022
गेल्या १० वर्षांत सहस्रो मुलींची इस्लामिक स्टेटसाठी तस्करी !
या चित्रपटाचा टीझरही (छाटे विज्ञापन) प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये आधी एक घड्याळ दाखवले आहे. हे घड्याळ रात्री ११.५६ वाजता चालू होऊन रात्री १२.०१ वाजता थांबते. घड्याळ थांबल्यावर एक ओळ पडद्यावर दिसते, ‘जर तुमची मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी पोचली नाही, तर तुम्हाला कसे वाटेल? केरळमध्ये सहस्रो मुली बेपत्ता झाल्या आहेत आणि गेल्या १२ वर्षांमध्ये त्या त्यांच्या घरी कधीच परतल्या नाहीत. गेल्या १० वर्षांपासून सहस्रो मुलींची इस्लामिक स्टेट आणि इतर इस्लामी युद्धक्षेत्रांमध्ये तस्करी करण्यात आली आहे.’ चित्रपटाच्या नावानंतर शेवटी लिहिले आहे की, ही कथा ३२ सहस्र मुलींची सत्यकथा आहे.