याविषयी स्वतःला निधर्मी म्हणवणारे काहीही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
बरेली (उत्तरप्रदेश) – नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मतदान केल्यामुळे उत्तरप्रदेशच्या बरेलीमध्ये एका मुसलमान महिलेला तिच्या नातेवाइकांनी घरातून हाकलून दिले, तसेच तिला तलाक देण्याचीही धमकी दिली.
पीडित महिलेने एका वर्षापूर्वी याच परिसरातील तस्लीम अन्सारी याच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघांचेही आयुष्य सुरळीत चालू होते. विधानसभा निवडणुकीत पती आणि सासरच्या मंडळींनी समाजवादी पक्षाला साथ दिली; मात्र भाजपच्या कार्यशैलीने प्रभावित झालेल्या पीडित महिलेने भाजपच्या उमेदवाराला मतदान केले.
पीडित महिलेने सांगितले की, भाजपने धर्म आणि जात यांमध्ये न अडकता समाजाच्या उत्कर्षासाठी काम केले. मोफत रेशन दिले, महिलांना संरक्षण दिले, तिहेरी तलाकविरोधी कायदा आणला. याविषयी तिच्या सासरच्या नातेवाइकांना कळताच त्यांनी पीडितेला मारहाण करून घरातून हाकलून दिले. यासह याविषयी पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.