बिहारमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक आंदोलनाच्या प्रकरणी पटना येथील खान यांच्यासह अन्य शिक्षकांविरूद्ध तक्रार प्रविष्ट !

भारतीय रेल्वेच्या ‘आर्.आर्.बी.-एन्.टी.पी.सी.’ आणि ‘ग्रुप डी’ परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत तरुणांनी प्रजासत्ताकदिनी हिंसक आंदोलन केले. या प्रकरणी पटना येथील शिक्षक खान यांच्यासह अन्य शिक्षकांविरूद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘देव माझ्या अंतर्वस्त्राचे माप घेत आहे !’

हिंदू संघटित नसल्यामुळेच वारंवार कुणीही देवतांचा अवमान करतो ! हिंदूंनी संघटित होऊन याचा तीव्र आणि वैध मार्गाने निषेध करायला हवा आणि संबंधित अभिनेत्रीला क्षमा मागण्यास भाग पाडायला हवे !

दूध भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई !

जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक, दूध संकलन केंद्रे, दूध प्रक्रिया केंद्रे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणारे दूध हे कायद्यातील मानकांप्रमाणे असल्याची निश्चिती करून पुढील प्रक्रियेसाठी घ्यावे आणि जनतेला निर्भेळ दूध पुरवावे – अन्न आणि औषध प्रशासन

नितेश राणेंचा अंतरिम अटकपुर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला !

त्यांचा अंतरिम अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळत त्यांनी दहा दिवसात जिल्हा न्यायालयाला शरण जावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे येथील हवेची गुणवत्ता ढासळली !

शहरातील अनेक ठिकाणी अतीसूक्ष्म धूलीकण (पी.एम्. २.५) आणि सूक्ष्म धूलीकण यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २४ जानेवारी या दिवशी हवेची गुणवत्ता ३७४ प्रतिघनमीटर इतकी नोंदवली गेली.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील विलंब टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात आणखी कर्मचारी वाढवण्याची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?

नाट्यगृह चालवू शकत नसाल, तर आयुक्तांनी आसंदी खाली करावी ! – मनसेची मागणी

मनसेचे शहराध्यक्ष म्हणाले की, संत एकनाथ रंगमंदिराचे खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तमरितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे.

धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – चंदगड येथे निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा, असे प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांची चौकशी करा या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने येथील तहसील कार्यालयात देण्यात आले.

सातारा येथे विवाहितेचा छळ करून हत्या !

विवाहित महिलांवरील अत्याचार चालूच रहाणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. कुटुंबव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी संस्कार आणि धर्मशिक्षण आवश्यक !

पुणे पोलीस दलातील चौघांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित !

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पोलीसदलासाठी राष्ट्रपती पदकांची घोषणा केली जाते.