अभिनेत्री श्वेता तिवारी यांचे पत्रकार परिषदेत संतापजनक वक्तव्य
मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश
हिंदू संघटित नसल्यामुळेच वारंवार कुणीही देवतांचा अवमान करतो ! हिंदूंनी संघटित होऊन याचा तीव्र आणि वैध मार्गाने निषेध करायला हवा आणि संबंधित अभिनेत्रीला क्षमा मागण्यास भाग पाडायला हवे ! – संपादक

भोपाळ – देव माझ्या अंतर्वस्त्राचे माप घेत आहे, असे संतापजनक वक्तव्य अभिनेत्री श्वेता तिवारी यांनी भोपाळ येथे एका पत्रकार परिषदेत केले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला असून या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आगामी ‘वेब सीरिज’ची (इंटरनेटवरील ऑनलाईन वाहिनीवरून प्रकाशित होणारी मालिकेची) घोषणा करतांना तिवारी यांनी हे वक्तव्य केले. या प्रकरणी तिवारी यांनी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी लोकांनी केली आहे.
Actor #ShwetaTiwari landed into controversy after she made an indecent remark on God during a promotional event#Viral https://t.co/Oe8pKrILOW
— DNA (@dna) January 27, 2022
ही बातमी देतांना अनेक वृत्तसंकेतस्थळांकडून ‘या कार्यक्रमात अभिनेत्रीने गमतीत केलेल्या त्या विधानामुळे तिला ट्रोल (टीका करणे) केले जात आहे’, अशी बातमी देण्यात आली. (वृत्तपत्रांना देव आणि धर्म यांविषयी काडीचीही संवेदनशीलता नसल्याने ते अभिनेत्रीचे गंभीर विधान गमतीत घेत आहेत ! – संपादक) याविषयी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, हा प्रकार सहन केला जाणार नाही. भोपाळच्या पोलीस आयुक्तांनी याचे अन्वेषण करून २४ घंट्यांत अहवाल सादर करावा.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त