पुणे पोलीस दलातील चौघांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित !

सौजन्य : लोकमत

पुणे – प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पोलीसदलासाठी राष्ट्रपती पदकांची घोषणा केली जाते. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वांजळे, विशेष शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी, लष्कर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय भोंग आणि आतंकवादविरोधी पथकातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ उभे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित झाले. नानवीज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे यांनाही उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे.