दूध भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई !

केवळ कारवाई करून नव्हे, तर दूध भेसळ होऊच नये, यासाठी ठोस प्रयत्न करायला हवेत !

पुणे – जिल्ह्यातील दूध भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई चालू केली आहे. या अंतर्गत डिसेंबर २०२१ मध्ये ३०० किलो वजनाची, तर जानेवारी २०२२ या कालावधीत ७ लाख १२ सहस्र २६४ रुपये किमतीची व्हे – पावडर शासनाधीन केली आहे.

जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक, दूध संकलन केंद्रे, दूध प्रक्रिया केंद्रे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणारे दूध हे कायद्यातील मानकांप्रमाणे असल्याची निश्चिती करून पुढील प्रक्रियेसाठी घ्यावे आणि जनतेला निर्भेळ दूध मिळण्यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्री. शिवाजी देसाई यांनी केले. तसेच ‘कायद्याअंतर्गत तरतुदींचा भंग करून व्यवसाय करणार्‍या दूध व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाई करणार आहे’, अशी माहितीही त्यांनी दिली.