विवाहित महिलांवरील अत्याचार चालूच रहाणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. कुटुंबव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी संस्कार आणि धर्मशिक्षण आवश्यक आहे.

सातारा, २७ जानेवारी (वार्ता.) – संगमनगर येथील सुजाता शंकर भोळे या २४ वर्षीय विवाहितेचा छळ करून तिला मारहाण करण्यात आली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला, अशी तक्रार माहेरच्या लोकांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सासरच्या लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.
विवाहितेचा छळ करून खून, सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल@SataraPolice https://t.co/CVK4Uei3u1
— Mumbai Tak (@mumbaitak) January 22, 2022
तक्रारीत म्हटले आहे की, सुजाता शंकर भोळे या महिलेला पती शंकर भोळे आणि कुटुंबिय मानसिक अन् शारीरिक त्रास देऊन उपाशी ठेवून क्रूर वागणूक देत होते. प्रयोगशाळा काढण्यासाठी आणि गाडी विकत घेण्यासाठी ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावत होते, तसेच तिला मुलगी झाल्यामुळे आणि पतीचे अनैतिक संबंध उघड केल्यामुळे पतीने पत्नीला मारहाण केली. पोलिसांनी पतीवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद केले आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न