बंगालमध्ये रेल्वेगाडीच्या अपघातात ३ जणांचा मृत्यू !
अपघातामध्ये रेल्वेगाडीचे ६ डबे रुळावरून घसरले, तर एकूण १२ डब्यांची हानी झाल्याचे वृत्त आहे.
‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार यांविषयीच्या बातम्या
देशभरात ‘लव्ह जिहाद’ च्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. हिंदु मुलींनी स्वत:चे आयुष्य आणि कुटुंब वाचवण्यासाठी धर्मांधांपासून जागृत होणे आवश्यक आहे !
मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत ‘ड्रोन’द्वारे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता !
महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.
सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा चित्रपट बनवणार्या महेश मांजरेकर यांनी मराठीजनांची क्षमा मागावी !
महिला आणि बाल लैंगिक दृश्ये असणार्या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी, समाजमनावर विपरीत परिणाम करणार्या अश्लाघ्य चित्रपटांना अनुमती मिळणे निषेधार्ह !
मकरसंक्रांतनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वाणवसा नेण्यास बंदी !
भाविकांना मंदिरात मुख दर्शनासाठी जातांना हार आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे देवास्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
गोवा विधानसभेच्या एक चतुर्थांश आमदारांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन आणि ३ चतुर्थांश आमदारांनी पक्षांतर करून केला राष्ट्रीय विक्रम !
जे निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी; म्हणून आपला पक्ष सोडून दुसर्या पक्षात जातात, ते राष्ट्रद्रोही असतात; कारण ते जनतेची फसवणूक करतात !
तोडगा काढण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि शरद पवार यांची चर्चा !
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन गेल्या वर्षी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
लोहगडावर होऊ घातलेल्या उरूसाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून प्रशासनाला निवेदन
‘लोहगड’ या संरक्षित स्मारकावर अवैधरित्या होणारे धार्मिक कार्यक्रम झाल्यास आयोजक, ट्रस्ट आणि संबंधित सर्वांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.